Posts

Showing posts from 2021

इच्छेचं अंकुर

इच्छा, आकांशा, जिद्द, मेहनत हे जगण्याचे किंतु परंतु आपल्या अवतीभवती किती सहजपणे हुंदळत असतात. पण त्याचे वास्तविक प्रमाण मोजणे हे अशक्यच. प्रत्येक व्यक्तीत काहिनाकाही सुप्त गुण दडलेलेच असतात. यश आणि अपयशाच्या सीमा ते रेखावट असतात. पण एवढासा मुद्दा जीवनाच्या प्रवासासाठी पुरेसा असतो का?; कारण सृष्टीमधील प्रत्येक जीव मग तो इवलासा असो किंवा भला मोठा आजतागायत त्याची शिदोरी जवळ जपतो. ह्या शिदोरीत बोलणं, चालणं, हसणं, रडणं, शिकणं, शिकवणं अशा कित्येक क्रिया विभिन्न स्वाद घेऊन आसनस्थ आहे. साहजिक हे परिमाणे व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेतच. समोर शिखर दिसत असले तरी तिथपर्यंत जाण्याच्या उमेदीला एक अंतर्मनाचा विश्वास आवश्यक असतो. नव्हे ते वादळे देहाच्या उभ्या आकृतीला डोलावतात; बर्याचदा जमीनदोस्त सुद्धा करतात. परंतु यातून हे प्रमाणित नाही होत की परत ते पीक त्या जमिनीत उभं राहण्यास असमर्थ असेल? जमीन नेहमी पिकाला सर्वोपरी आधार देण्याचे कर्तृत्व बजावत असते. हीच जमीन म्हणजे आपल्या मनातला आत्मविश्वास, एक संवेदना, एक उमेद, एक आशीर्वाद. आणि हे वादळ केव्हा भिरकी घेत जवळ येईल हे अनिश्चित. पण कुठणकुठं ह्या वादळाचा