इच्छेचं अंकुर

इच्छा, आकांशा, जिद्द, मेहनत हे जगण्याचे किंतु परंतु आपल्या अवतीभवती किती सहजपणे हुंदळत असतात. पण त्याचे वास्तविक प्रमाण मोजणे हे अशक्यच. प्रत्येक व्यक्तीत काहिनाकाही सुप्त गुण दडलेलेच असतात. यश आणि अपयशाच्या सीमा ते रेखावट असतात. पण एवढासा मुद्दा जीवनाच्या प्रवासासाठी पुरेसा असतो का?; कारण सृष्टीमधील प्रत्येक जीव मग तो इवलासा असो किंवा भला मोठा आजतागायत त्याची शिदोरी जवळ जपतो. ह्या शिदोरीत बोलणं, चालणं, हसणं, रडणं, शिकणं, शिकवणं अशा कित्येक क्रिया विभिन्न स्वाद घेऊन आसनस्थ आहे. साहजिक हे परिमाणे व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेतच. समोर शिखर दिसत असले तरी तिथपर्यंत जाण्याच्या उमेदीला एक अंतर्मनाचा विश्वास आवश्यक असतो. नव्हे ते वादळे देहाच्या उभ्या आकृतीला डोलावतात; बर्याचदा जमीनदोस्त सुद्धा करतात. परंतु यातून हे प्रमाणित नाही होत की परत ते पीक त्या जमिनीत उभं राहण्यास असमर्थ असेल? जमीन नेहमी पिकाला सर्वोपरी आधार देण्याचे कर्तृत्व बजावत असते. हीच जमीन म्हणजे आपल्या मनातला आत्मविश्वास, एक संवेदना, एक उमेद, एक आशीर्वाद. आणि हे वादळ केव्हा भिरकी घेत जवळ येईल हे अनिश्चित. पण कुठणकुठं ह्या वादळाचा संकेत मेघगर्जना होण्यास कारणीभूत असतो. ते मात्र पिकासाठी इच्छेच्या अनुरूप. या अर्थी इच्छा तिचं गाव कोणत्याही खडतर मार्गानेही गाठते. भविष्यात जाऊन आपले प्रतिबिंब बघणं याला म्हणतात स्वपरिक्षण. अर्थातच हे स्वपरिक्षण म्हणजेच भविष्य नव्हे; तर ललाटी कोरलेल्या रेषांना समजून घेतलेला एक प्रयत्न.

दैनंदिन व्यक्तीगत जीवनात आशेचे किरणे कधी डोकावतील याचा नेम हा अनिश्चित असतो. पण ते येतील असं मनात असणारी प्रबळ इच्छा, संकल्पना भविष्या सोबत गाठ बांधून चालत असते. माणसाचे कर्म हे नक्कीच त्याला प्रतिसाद देऊन त्याचा आत्मविश्वास खंबीर करत असते. मात्र हे ध्येय गाठताना किती परिस्थितींना सामोरे जावे लागते हेही प्रशंसनीय. शिखरावर तर जायचं हा मनात उमटलेला ठसा असतो; पण त्यामागे करावे लागणारे प्रयत्न हे हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे सतत कारकिर्दीत असतात. कुंभार जसा मडकं घडवण्याकरिता मातीला आकार देण्याचा प्रयत्न करतो, तसंच प्रत्येक मनुष्य हा स्वतःच उत्तमातलं उत्तम अस्तित्व धारण करत असतो. आणि करायलाच हवं, त्याचा फरक हा स्वतःपुर्तीच मर्यादित नसता समाजातील केंद्रबिंदूंशी संलग्नित दिसून येतो. पण का म्हणून कधीतरी परंपरेने आलेली विचारसरणी माणसात बदल घडविण्यास आळा घालते. ती विचारधारा योग्य आहे की अयोग्य हा दुसरा प्रश्न...; परंतु त्या विचारांना अद्ययावत स्वरूप देने हे महत्वाचे दिसून येते.

जगण्याचे काही बंधने हे आपल्या अख्यारीत तर काही निसर्गाच्या, काही शासनाच्या, काही समाजाच्या तर काही नियतीच्या. आजकालच्या Autonomous जीवनात प्रत्येकाला एक विचार करण्याचा अधिकार, मत मांडण्याची, मुक्तपणे विहार करण्याची मुभा ही प्राप्त आहे. यामुळे एखाद्या समस्येवर निवारण निघते तर कधी समस्या निर्माण होते. मोकळे स्वातंत्र्य हे मर्यादेच्या कुंपणाने वेढलेले आहे. आणि अशा मर्यादा जीवनाच्या प्रत्येक घटनांच्या परिसीमा बनून त्याला सुसंगत करत असतात. तस बघितलं तर मर्यादा ह्या फक्त बाह्यरूपी मनासाठी निर्मित झालेल्या असतात. अंतरःमन हे मेंदूशी मिळूनमिसळून विचार करत असते. इथे मर्यादा नसल्याने इच्छा व्यक्त होते आणि ती साकार करण्याचं प्रयोजन मेंदू आणि शरीराकडे सुपूर्त होते. एकदाच की मर्याद्यांचे आवरण लागले की जिद्द आणि मेहनत आपोआप क्रियाशील होते. मर्यादांच्या यादीत समावेश होतो तो म्हणजे संस्कारांचा, माणुसकीचा, नम्रतेचा, आदराचा आणि अशाच निर्मळ गुणात्मकतेचा; जेणेकरून इच्छेचं आवरण फुलासारखे कोमल असायला हवे. मेहनत ही इच्छेचा भूगोल बनायला सुसज्ज असते आणि अनुभव हा इतिहासच महत्व जपून ठेवतो. तात्पर्य हाच की अनुभवाचा आधार हा जीवनाच्या तराजुला समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. 'स्वतंत्र' ह्या शब्दाचा अर्थ कधी काळी कोणावर अवलंबून राहूनच समजला जातो. Being independent and being dependent both are unsupportive without each other. 

परिस्थिती ही जणू इच्छेची कुलदैवतच. याच साधं उदाहरण म्हटलं तर लगेच हिरकणी ची गोष्ट कानाआडून गेल्याशिवाय राहत नाही. एका आईची ममता उंच कड्यावर तर बाळाचं रडणं कड्याच्या पायथ्याशी. परिस्थिती त्या आईला सहज मार्गाने जाऊ देण्यास असमर्थ होत होती. तिला कडा उतरायचा नव्हता तरी तिने ते आव्हान परिस्थितीच्या आदेशाने स्वीकृत केले. भुकेल्यापोटी असलेल्या बाळाबद्दल आईची अपार ममता, संवेदना कधी आंतरिक इच्छेत रूपांतर झाली हे फक्त परिस्थितीलाच माहिती. मर्याद्यांची जागा स्नेहाने जिंकली असते. याचप्रमाणे परिस्थिती माणसाच्या चांगल्या गुणांची मूळ खोलवर जाण्यास भाग पाडते आणि खरंच त्यातून शोषलेले मूलद्रव्ये जीवनाच्या झाडाला उंच उंच नेण्यास मदत करतात. नवीन फुटलेल्या पालव्या जुन्या पालव्यांची भर काढत असतात. आणि हेच झाड जगता जगता त्याची सावली इतरांसाठी उपलब्ध करून देते.

जीवनाच्या रहस्यमयी धाग्याचे एक टोक आपल्या जगण्याला तर दुसरे नियतीच्या घटनांना बांधील आहे. आनंद, उत्स्फूर्तपणा, दुःख, विजय, हार अशे सांकेतांक + आणि - यात गुरफटलेले आहे. जीवनातील सौन्दर्य कुणाच्या भाग्यरेषा कशा आहेत याऐवजी त्या भाग्यरेषांचे प्रयोजने व्यक्तीच्या जीवनात समाधानाचं बीज कसं रोवतात यात दडलेलं आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परिस्थिती

Remains balanced?