परिस्थिती

भविष्यातील स्वप्ने ही नेहमी एका सरळ रेघे मध्ये मावतील असा समज माणसाला वर्तमान स्थितीत असतो. त्या प्रमाणे तो त्याची सूत्रे जुळवत असतो. पण जस जसा तो त्याच्या प्रवासाच्या दिशेने प्रस्थान करायला लागतो, तस तसं त्याला हे अवगत होते की त्याची स्वप्ने ही चालणाऱ्या मार्गात नसून त्यांनी वाटेच्या आजूबाजूला ठाम मारले आहे. शेवटी उपाय एकच, आपला समज बदलवायचा आणि त्या स्वप्नांना आपल्या समजलेल्या वाटेवर आणायचे. पण त्यांना जवळ आणण्यासाठी, मनुष्याला त्यांच्या जवळ जावेच लागणारं, त्यांचं परीक्षण करावेच लागणारं, त्यांचं स्वरूप आत्मसात करून त्यांचे मार्गांबद्दल चौकशी करावीच लागणारं. आणि अशा ह्या प्रवासाला माणूस नाव देतो ते म्हणजे ' प्रयत्न '. आणि अशाच प्रयत्नांची छोटी छोटी रोपटे मनुष्य रोवत चालतो. हीच प्रयत्नांची शिदोरी स्वप्नांचा गड जिंकायला सखा म्हणून सोबत असते. माणसाच्या इच्छेच्या विरुद्ध घडत असेल तर ते नकोसे वाटते. पण त्यामागील परिस्थितीचा आढावा, त्यामागील असलेले अंकगणित याचा हिशोब घेण्याच मनुष्य किती सहजपणे विसरून जातो. याच्या परिनामात्मक तो निर्णय घेतो आणि त्याच्या समजपणाचा कुंपण त्याच्या अवतीभवती बांधून घेतो. कधी काळी आपले हे कुंपण इतरांसाठी किती त्रासदायक ठरेल याचा प्रमानात्मक विचार मनुष्याने पुढील पाऊल टाकताना करायला हवा.

आज नाही तर उद्या आपल्या इच्छेला पारंब्या फुटतीलच. पण याचा अर्थ असा नाही की आपण अयोग्य निर्णय घेऊन स्वइच्छेचा प्रखर उजेड एका अंधारात बंदिस्त करायचा. आपल्याला हवा असलेला प्रत्येक क्षण हा कधी काळी परिस्थितीशी झुंज देत असतो, फरक एवढाच की ती परिस्थिति आपल्याशी लपंडाव खेळते. ह्या सर्व प्रांगणात मनुष्य हा त्याच्या स्वदृष्टीकोनातून मर्यादा सीमांकित करताना दिसून येतो. आयुष्याच गणित हे आपल्या हातात नाही हे खरचं, पण ते गणित नियती नेहमी परिस्थिति च्या अनुरूप जुडवत असते हे मात्र काळ्या पाशाणावरची रेघ. परिस्थिती ही एका पडद्या सारखी असते. आपल्याला जे दिसत आहे तीच वास्तविकता आहे असा गैरसमजाचा अनुमान निश्चितच उदयास येतो. पण पडद्याच्या पलीकडील वास्तविकता ही फक्त विधात्याला आणि पडद्यामागील संघर्ष करणाऱ्यांनाच माहित.

परिस्थिती ही कधीच गरीब अथवा श्रीमंत यात दुभंगत नसली, तरी मात्र तिचे आवरण हे पर्याप्त विकल्पांमुळे विविध आकारांनी नटवले जाते. आणि हे आवरण संवेदणेच्या किरणांनी अधिक प्रखर होत जाते. समंजस विचार, त्यांची स्वीकृती आणि आख्यांकित प्रयोजने हे मात्र कोणत्याही मार्गात सहज दिसून येतात. ह्या भूतलावर अनन्य सारी जीवसृष्टी काही उद्देशांसाठी जगत आहे. हे उद्देश काही स्वयं निर्मित असतात तर काही नियतीच्या अध्यारुत बांधील असतात. कालांतराने ह्या उद्दिष्टांवर मर्यादेचे शिंपण लागतं. स्वप्नांची रूपरेषा प्रगलभित होते. विचारांना नवीन अनुभवांचे मोहर फुलतात. आणि अशाप्रकारे उद्दिष्टे साध्य होतात. कुणी एका काळोख्या अंधारात दीपज्योती च्या शोधात तर कुणी लख्ख प्रकाशात चांदण्यांच्या शोधात गुंग. सांगायचा तात्पर्य हाच की, जरी आवरण विभिन्न असले तरी धेयात्मक प्रवास हा मात्र आंतरिक इच्छेचा एक परिपाक असतो. अशा प्रवासामध्ये खूप काही गोष्टी आत्मसात करून बघितलेल्या क्षितिजाच्या परी नवीन आव्हानांशी गट्टी जमते.

सर्वांची जीवनगाथा ही जरी वेगवेगळी असली तरी इच्छा, आत्मविश्वास, आनंद, दुःख, उमेद, भावना, प्रेम व संवेदना ह्यांची सांगड जणू त्यांचा जीवनात्मक आधार वाटू लागतो. हीच सांगड येणाऱ्या वादळांना तिच्या अपार शक्तीने निशस्त्र करण्याचा प्रयत्न करत राहते. हे गरजेचे नाही की एकाने अनुभवलेले वादळ दुसऱ्या व्यक्तीसाठी पण वादळचं असेल. असं लिहलं जातं ते म्हणजे आठवणींच कोर पान आणि हळूहळू हा आठवणींचा झरा आयुष्याच्या आसमंतात खुला होऊन नदीकाठ गाठतो. परिस्थितीचे संघर्ष हे जीवन जगायला भाग पाडतात, कुणासाठी किती प्रमाणात आनंदमय तर कुणासाठी किती प्रमाणात दुखात्मक हे आयुष्याच्या अधोरेखित केलेल्या भविष्यावर अवलंबून. अशा या संघर्षातून होते प्रगती ती म्हणजे मनुष्याच्या वाटचालीची. 

Comments

Popular posts from this blog

इच्छेचं अंकुर

Remains balanced?