परिस्थिती
भविष्यातील स्वप्ने ही नेहमी एका सरळ रेघे मध्ये मावतील असा समज माणसाला वर्तमान स्थितीत असतो. त्या प्रमाणे तो त्याची सूत्रे जुळवत असतो. पण जस जसा तो त्याच्या प्रवासाच्या दिशेने प्रस्थान करायला लागतो, तस तसं त्याला हे अवगत होते की त्याची स्वप्ने ही चालणाऱ्या मार्गात नसून त्यांनी वाटेच्या आजूबाजूला ठाम मारले आहे. शेवटी उपाय एकच, आपला समज बदलवायचा आणि त्या स्वप्नांना आपल्या समजलेल्या वाटेवर आणायचे. पण त्यांना जवळ आणण्यासाठी, मनुष्याला त्यांच्या जवळ जावेच लागणारं, त्यांचं परीक्षण करावेच लागणारं, त्यांचं स्वरूप आत्मसात करून त्यांचे मार्गांबद्दल चौकशी करावीच लागणारं. आणि अशा ह्या प्रवासाला माणूस नाव देतो ते म्हणजे ' प्रयत्न '. आणि अशाच प्रयत्नांची छोटी छोटी रोपटे मनुष्य रोवत चालतो. हीच प्रयत्नांची शिदोरी स्वप्नांचा गड जिंकायला सखा म्हणून सोबत असते. माणसाच्या इच्छेच्या विरुद्ध घडत असेल तर ते नकोसे वाटते. पण त्यामागील परिस्थितीचा आढावा, त्यामागील असलेले अंकगणित याचा हिशोब घेण्याच मनुष्य किती सहजपणे विसरून जातो. याच्या परिनामात्मक तो निर्णय घेतो आणि त्याच्या समजपणाचा कुंपण त्याच्या अवतीभव...